27 October 2010

My Blog Topic List

नमस्कार मित्रांनो,

माझ्या ब्लॉगमधील सर्व लेखांच्या लिंक खालील प्रमाणे -

माझे लेख आपल्याला नक्की आवडतील हीच अपेक्षा.

आपला,

विनोपाल
(विनोद रमेश सातवे)

Watermarking Photos

प्रिय फोटोग्राफर मित्रांनो,

आपण मोठ्या कौशल्याने काढलेले फोटो आपल्या मित्रमैत्रिणींना दाखविण्यासाठी internet वर अपलोड करतो. परंतु खरे पाहता या मायाजालावर कोणाचेही नियंत्रण नाही आणि तुम्ही काढलेला एखादा चांगला फोटो चोरला जाऊन दुसरा कोणीतरी आपल्या नावावर खपविण्याचा प्रयत्न करु शकतो.


परंतु फोटोवर Watermark किंवा Copyright टाकल्याने ही जोखीम कमी होते. त्यासाठी एक उपयुक्त सॉफ्टवेअर इंटरनेटवर फुकट उपलब्ध आहे. त्याचा वापर करावा.



हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या Google Search मध्ये "Photo Dater 1.2 - Jason Specht" असे टाईप करा आणि उपलब्ध असेल, तिकडून ते Download करुन घ्या.

वॉटरमार्क टाकण्यापूर्वी


वॉटरमार्क टाकल्यानंतर


वॉटरमार्क टाकताना तो फोटोवर सहज दिसेल व फोटोतल्या रंगात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी.


- विनोपाल

10 October 2010

Resize your Photos in 5 easy steps for Quick Web Upload!

माझ्या प्रिय फोटोग्राफर मित्रांनो,

तुम्ही तुमच्या आवडत्या डिजिटल कॅमे-यातनं हौसेनं फोटो काढता व इतरांनाही दाखवता. अलीकडे इंटरनेटचा, त्यातल्या त्यात Orkut, Facebook या साईट्सचा वापर भलताच वाढलाय. जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत तुमची फोटोग्राफी पोहोचविण्यासाठी internet या माध्यमाचा फारच उपयोग होऊ शकतो. शक्कल फक्त एकच लढवावी लागते - फोटो काँम्प्युटरवर घ्या, अपलोड करा आणि शेअर करा.

फोटो अपलोड करण्याच्या या भानगडीत अनेक दिव्ये पार करावी लागतात. उदा. फोटो जास्त मोठा (आकाराने आणि बाईट्सनेही) असून चालत नाही. तो कमीत कमी आकाराचा असावा लागतो, जेणेकरुन पटकन अपलोड करता येईल, आणि इथेच आपल्यासारख्या नवख्यांचे घोडे अडते.....

सध्या प्रचलित असलेल्या नामांकित कंपन्यांचे डिजिटल कॅमेरे किमान 8MP ते 10MP (MP: Megapixels) पर्यंतचे असतात.  आता तर मोबाईलमध्ये सुद्धा 5MP चा कँमेरा येऊ लागलाय. यातून काढलेल्या फोटोची साईझ किमान 2MB (Megabytes) होते. इंटरनेटवर फोटो अपलोड करण्याच्या दृष्टीने ही साईझ खूप मोठी आहे. कारण यामुळे अपलोड होण्यास वेळ तर लागतोच, पण ज्या साईटवर तो अपलोड होतो, तिथे लोड होण्यासही वेळ लागतो.

इथे एक शक्कल लढवावी लागते. तुमचे फोटो Resize करा... या कामासाठी Microsoft च्या साईटवर एक PowerToy फुकट डाऊनलोड करता येते.

आपण यास शक्कल सॉफ्टवेअर असे म्हणू या. याचे नाव आहे, ImageResizerPowerToy.

Download Now

1. नोट- सदर सेटअप फाईल ही मायक्रोसॉफ्टची असल्याने कोणतीही भिती नाही. ती install करा आणि Setup पूर्ण करा.

2. सेटअप पूर्ण झाल्यानंतर जे फोटो आपणांस Resize करायचे असतील, ते एका वेगळ्या Folder मध्ये कॉपी करा.

3. सदर फोटोंवर Right Click करा






4. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली साईझ choose करा.



5. OK बटणावर Click करा.... झाले की...

या छोट्याशा युटीलीटीमुळे झटक्यात सर्व फोटो Resize होतात.  त्यातल्या Advanced बटणावर क्लिक करा आणि आणखी काही Options ट्राय करा.


आणि हो...
तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की द्या..

- विनोपाल

26 February 2010

Photofair 2010, Mumbai



फोटो काढण्याचा छंद असणा-यांसाठी आणि फोटो काढण्याचा स्वयंरोजगार असण्यासाठी PhotoFair ही एक पर्वणीच असते. दरवर्षी जानेवारी दरम्यान या उत्सवाचे आयोजन केले जाते. एका मोठ्याशा Exhibition Hall मध्ये अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल उभारले जातात आणि कॅमेरा, फोटो, स्टँड, लाईट्स, ट्रॉली इत्यादींची नवनवीन उत्पादनांची जंत्री आपल्या स्वागतासाठी उभी असते.



कुठल्याही स्टॉलवर जायचे, हवा तो कॅमेरा उचलायचा, ट्राय करायचा, त्याबद्दल माहिती विचारायची, त्यांचे व्हिजिटींग कार्ड, किंवा पँम्फलेट घ्यायचे, असा या Exhibition चा शिरस्ता आहे. Canon, Nikon, Panasonic, Samsung, HP, Kodak यांचे स्टॉल तर नजर लागण्यासारखे असतात. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या स्पर्धा व आकर्षक बक्षिसे जाहीर करतात.



या आयोजनाव्यतिरिक्त कँमे-यांचे नवीन मॉडेल्स ग्राहकांच्या comments / suggestions साठी ठेवलेले असतात. तुम्ही ते उचलून ट्राय करा आणि बिनधास्त अभिप्राय द्या. कंपन्यांचे CEO तसेच काही Celebrities सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून भेट देतात.

यावर्षी आयोजनाचा मान दिल्लीला मिळाला आहे. तिथे दि. 6 ते 9 जानेवारी 2011 दरम्यान प्रगती मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन होईल. तेव्हा, मुंबईकर शौकिनांसाठी जानेवारी-2012 चा वाट पहावी लागेल.


मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन Bombay Exhibition Centre, Goregaon (East) येथे केले जाते. जानेवारी-2010 मध्ये झालेल्या फोटोफेअरचे काही फोटो गमतीदार कॅप्शनसह माझ्या ऑर्कूट प्रोफाईलमध्ये टाकलेले आहेत [Click Here]. बघ्यांनी गर्दी करण्यास हरकत नाही. SONY आणि Canon या दादा कंपन्यांचा बहिष्कार असूनही हा छंद जोपासणा-यांच्या उत्साहात किंचितही कमतरता दिसली नाही.

- विनोपाल