Photofair 2010, Mumbai
फोटो काढण्याचा छंद असणा-यांसाठी आणि फोटो काढण्याचा स्वयंरोजगार असण्यासाठी PhotoFair ही एक पर्वणीच असते. दरवर्षी जानेवारी दरम्यान या उत्सवाचे आयोजन केले जाते. एका मोठ्याशा Exhibition Hall मध्ये अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल उभारले जातात आणि कॅमेरा, फोटो, स्टँड, लाईट्स, ट्रॉली इत्यादींची नवनवीन उत्पादनांची जंत्री आपल्या स्वागतासाठी उभी असते. कुठल्याही स्टॉलवर जायचे, हवा तो कॅमेरा उचलायचा, ट्राय करायचा, त्याबद्दल माहिती विचारायची, त्यांचे व्हिजिटींग कार्ड, किंवा पँम्फलेट घ्यायचे, असा या Exhibition चा शिरस्ता आहे. Canon, Nikon, Panasonic, Samsung, HP, Kodak यांचे स्टॉल तर नजर लागण्यासारखे असतात. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या स्पर्धा व आकर्षक बक्षिसे जाहीर करतात. या आयोजनाव्यतिरिक्त कँमे-यांचे नवीन मॉडेल्स ग्राहकांच्या comments / suggestions साठी ठेवलेले असतात. तुम्ही ते उचलून ट्राय करा आणि बिनधास्त अभिप्राय द्या. कंपन्यांचे CEO तसेच काही Celebrities सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून भेट देतात. यावर्षी आयोजनाचा मान दिल्लीला मिळाला आहे. तिथे दि. 6 ते 9 जान...