Megapixel (MP) मेगापिक्सेल म्हणजे काय ?
प्रत्येक फोटो हा निरनिराळ्या लहान बिंदूंनी बनलेला असतो.उदा. रांगोळीच्या कणाकणांनी एक चित्र निर्माण होतं, त्याचप्रमाणे.तर फोटोतल्या अशा एका कणाला pixel म्हणून संबोधलं जातं. यातील सहस्त्र (1000) pixels नी एक megapixel बनतो ज्याला डिजिटल कॅमे-याच्या भाषेत 1 megapixel किंवा 1MP म्हणतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेले कॅमेरे हे 4MP, 5MP, 7MP, 10MP चे असतात. जास्त एमपी म्हणजे फोटो जास्त चांगला असा होत नाही. सामान्य माणसाची याप्रमाणे फसगत होते. परंतु जेवढं जास्त एमपी, तेवढा फोटो मोठा मात्र येतो हे खरं.उदा. 4MP मधून 4"x6" चा फोटो उत्कृष्ट येतो.5MP = 5" x 6"7MP = 8" x 12"यापेक्षा अधिक एमपी असलेले कॅमेरे अधिक महाग असतात. चांगला फोटो येणं हे परिस्थितीवर आणि फोटो काढणा-याच्या कौशल्यावर अवलंबून असतं.एक चांगला फोटो येण्यासाठी स्थळ, परिस्थीती, प्रकाश, रंग याचे उत्कृष्ट सुवर्णमध्य जमून यावे लागतात.म्हणून कधीकधी मोबाईलच्या कॅमे-यातूनही एखादा सनसेट अगदी झक्कास निघू शकतो. त्यामुळे महाग कॅमेरा घेतला म्हणून चांगले फोटो येतीलच अशी शास्वती नाही.