माझ्या प्रिय फोटोग्राफर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आवडत्या डिजिटल कॅमे-यातनं हौसेनं फोटो काढता व इतरांनाही दाखवता. अलीकडे इंटरनेटचा, त्यातल्या त्यात Orkut, Facebook या साईट्सचा वापर भलताच वाढलाय. जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत तुमची फोटोग्राफी पोहोचविण्यासाठी internet या माध्यमाचा फारच उपयोग होऊ शकतो. शक्कल फक्त एकच लढवावी लागते - फोटो काँम्प्युटरवर घ्या, अपलोड करा आणि शेअर करा. फोटो अपलोड करण्याच्या या भानगडीत अनेक दिव्ये पार करावी लागतात. उदा. फोटो जास्त मोठा (आकाराने आणि बाईट्सनेही) असून चालत नाही. तो कमीत कमी आकाराचा असावा लागतो, जेणेकरुन पटकन अपलोड करता येईल, आणि इथेच आपल्यासारख्या नवख्यांचे घोडे अडते..... सध्या प्रचलित असलेल्या नामांकित कंपन्यांचे डिजिटल कॅमेरे किमान 8MP ते 10MP (MP: Megapixels) पर्यंतचे असतात. आता तर मोबाईलमध्ये सुद्धा 5MP चा कँमेरा येऊ लागलाय. यातून काढलेल्या फोटोची साईझ किमान 2MB (Megabytes) होते. इंटरनेटवर फोटो अपलोड करण्याच्या दृष्टीने ही साईझ खूप मोठी आहे. कारण यामुळे अपलोड होण्यास वेळ तर लागतोच, पण ज्या साईटवर तो अपलोड होत...
Comments