Resize your Photos in 5 easy steps for Quick Web Upload!
माझ्या प्रिय फोटोग्राफर मित्रांनो,
तुम्ही तुमच्या आवडत्या डिजिटल कॅमे-यातनं हौसेनं फोटो काढता व इतरांनाही दाखवता. अलीकडे इंटरनेटचा, त्यातल्या त्यात Orkut, Facebook या साईट्सचा वापर भलताच वाढलाय. जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत तुमची फोटोग्राफी पोहोचविण्यासाठी internet या माध्यमाचा फारच उपयोग होऊ शकतो. शक्कल फक्त एकच लढवावी लागते - फोटो काँम्प्युटरवर घ्या, अपलोड करा आणि शेअर करा.
फोटो अपलोड करण्याच्या या भानगडीत अनेक दिव्ये पार करावी लागतात. उदा. फोटो जास्त मोठा (आकाराने आणि बाईट्सनेही) असून चालत नाही. तो कमीत कमी आकाराचा असावा लागतो, जेणेकरुन पटकन अपलोड करता येईल, आणि इथेच आपल्यासारख्या नवख्यांचे घोडे अडते.....
सध्या प्रचलित असलेल्या नामांकित कंपन्यांचे डिजिटल कॅमेरे किमान 8MP ते 10MP (MP: Megapixels) पर्यंतचे असतात. आता तर मोबाईलमध्ये सुद्धा 5MP चा कँमेरा येऊ लागलाय. यातून काढलेल्या फोटोची साईझ किमान 2MB (Megabytes) होते. इंटरनेटवर फोटो अपलोड करण्याच्या दृष्टीने ही साईझ खूप मोठी आहे. कारण यामुळे अपलोड होण्यास वेळ तर लागतोच, पण ज्या साईटवर तो अपलोड होतो, तिथे लोड होण्यासही वेळ लागतो.
इथे एक शक्कल लढवावी लागते. तुमचे फोटो Resize करा... या कामासाठी Microsoft च्या साईटवर एक PowerToy फुकट डाऊनलोड करता येते.
आपण यास शक्कल सॉफ्टवेअर असे म्हणू या. याचे नाव आहे, ImageResizerPowerToy.
Download Now
1. नोट- सदर सेटअप फाईल ही मायक्रोसॉफ्टची असल्याने कोणतीही भिती नाही. ती install करा आणि Setup पूर्ण करा.
2. सेटअप पूर्ण झाल्यानंतर जे फोटो आपणांस Resize करायचे असतील, ते एका वेगळ्या Folder मध्ये कॉपी करा.
3. सदर फोटोंवर Right Click करा
4. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली साईझ choose करा.
5. OK बटणावर Click करा.... झाले की...
या छोट्याशा युटीलीटीमुळे झटक्यात सर्व फोटो Resize होतात. त्यातल्या Advanced बटणावर क्लिक करा आणि आणखी काही Options ट्राय करा.
आणि हो...
तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की द्या..
- विनोपाल
Comments