Posts

My Blog Topic List

नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमधील सर्व लेखांच्या लिंक खालील प्रमाणे - Watermarking Photos     Resize your Photos in 5 Easy Steps for Quick Web Upload     Photofair 2010, Mumbai     Megapixel (MP) मेगापिक्सेल म्हणजे काय ?     Activating Marathi (UNICODE) on Windows-XP SP2     मला आवडलेली कविता माझे लेख आपल्याला नक्की आवडतील हीच अपेक्षा. आपला, विनोपाल (विनोद रमेश सातवे)

Watermarking Photos

Image
प्रिय फोटोग्राफर मित्रांनो, आपण मोठ्या कौशल्याने काढलेले फोटो आपल्या मित्रमैत्रिणींना दाखविण्यासाठी internet वर अपलोड करतो. परंतु खरे पाहता या मायाजालावर कोणाचेही नियंत्रण नाही आणि तुम्ही काढलेला एखादा चांगला फोटो चोरला जाऊन दुसरा कोणीतरी आपल्या नावावर खपविण्याचा प्रयत्न करु शकतो. परंतु फोटोवर Watermark किंवा Copyright टाकल्याने ही जोखीम कमी होते. त्यासाठी एक उपयुक्त सॉफ्टवेअर इंटरनेटवर फुकट उपलब्ध आहे. त्याचा वापर करावा. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या Google Search मध्ये "Photo Dater 1.2 - Jason Specht" असे टाईप करा आणि उपलब्ध असेल, तिकडून ते Download करुन घ्या. वॉटरमार्क टाकण्यापूर्वी वॉटरमार्क टाकल्यानंतर वॉटरमार्क टाकताना तो फोटोवर सहज दिसेल व फोटोतल्या रंगात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी. - विनोपाल

Resize your Photos in 5 easy steps for Quick Web Upload!

Image
माझ्या प्रिय फोटोग्राफर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आवडत्या डिजिटल कॅमे-यातनं हौसेनं फोटो काढता व इतरांनाही दाखवता. अलीकडे इंटरनेटचा, त्यातल्या त्यात Orkut, Facebook या साईट्सचा वापर भलताच वाढलाय. जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत तुमची फोटोग्राफी पोहोचविण्यासाठी internet या माध्यमाचा फारच उपयोग होऊ शकतो. शक्कल फक्त एकच लढवावी लागते - फोटो काँम्प्युटरवर घ्या, अपलोड करा आणि शेअर करा. फोटो अपलोड करण्याच्या या भानगडीत अनेक दिव्ये पार करावी लागतात. उदा. फोटो जास्त मोठा (आकाराने आणि बाईट्सनेही) असून चालत नाही. तो कमीत कमी आकाराचा असावा लागतो, जेणेकरुन पटकन अपलोड करता येईल, आणि इथेच आपल्यासारख्या नवख्यांचे घोडे अडते..... सध्या प्रचलित असलेल्या नामांकित कंपन्यांचे डिजिटल कॅमेरे किमान 8MP ते 10MP (MP: Megapixels) पर्यंतचे असतात.  आता तर मोबाईलमध्ये सुद्धा 5MP चा कँमेरा येऊ लागलाय. यातून काढलेल्या फोटोची साईझ किमान 2MB (Megabytes) होते. इंटरनेटवर फोटो अपलोड करण्याच्या दृष्टीने ही साईझ खूप मोठी आहे. कारण यामुळे अपलोड होण्यास वेळ तर लागतोच, पण ज्या साईटवर तो अपलोड होतो, तिथे लोड होण्यासही वे

Photofair 2010, Mumbai

Image
फोटो काढण्याचा छंद असणा-यांसाठी आणि फोटो काढण्याचा स्वयंरोजगार असण्यासाठी PhotoFair ही एक पर्वणीच असते. दरवर्षी जानेवारी दरम्यान या उत्सवाचे आयोजन केले जाते. एका मोठ्याशा Exhibition Hall मध्ये अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल उभारले जातात आणि कॅमेरा, फोटो, स्टँड, लाईट्स, ट्रॉली इत्यादींची नवनवीन उत्पादनांची जंत्री आपल्या स्वागतासाठी उभी असते. कुठल्याही स्टॉलवर जायचे, हवा तो कॅमेरा उचलायचा, ट्राय करायचा, त्याबद्दल माहिती विचारायची, त्यांचे व्हिजिटींग कार्ड, किंवा पँम्फलेट घ्यायचे, असा या Exhibition चा शिरस्ता आहे. Canon, Nikon, Panasonic, Samsung, HP, Kodak यांचे स्टॉल तर नजर लागण्यासारखे असतात. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या स्पर्धा व आकर्षक बक्षिसे जाहीर करतात. या आयोजनाव्यतिरिक्त कँमे-यांचे नवीन मॉडेल्स ग्राहकांच्या comments / suggestions साठी ठेवलेले असतात. तुम्ही ते उचलून ट्राय करा आणि बिनधास्त अभिप्राय द्या. कंपन्यांचे CEO तसेच काही Celebrities सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून भेट देतात. यावर्षी आयोजनाचा मान दिल्लीला मिळाला आहे. तिथे दि. 6 ते 9 जान

Megapixel (MP) मेगापिक्सेल म्हणजे काय ?

प्रत्येक फोटो हा निरनिराळ्या लहान बिंदूंनी बनलेला असतो.उदा. रांगोळीच्या कणाकणांनी एक चित्र निर्माण होतं, त्याचप्रमाणे.तर फोटोतल्या अशा एका कणाला pixel म्हणून संबोधलं जातं. यातील सहस्त्र (1000) pixels नी एक megapixel बनतो ज्याला डिजिटल कॅमे-याच्या भाषेत 1 megapixel किंवा 1MP म्हणतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेले कॅमेरे हे 4MP, 5MP, 7MP, 10MP चे असतात. जास्त एमपी म्हणजे फोटो जास्त चांगला असा होत नाही. सामान्य माणसाची याप्रमाणे फसगत होते. परंतु जेवढं जास्त एमपी, तेवढा फोटो मोठा मात्र येतो हे खरं.उदा. 4MP मधून 4"x6" चा फोटो उत्कृष्ट येतो.5MP = 5" x 6"7MP = 8" x 12"यापेक्षा अधिक एमपी असलेले कॅमेरे अधिक महाग असतात. चांगला फोटो येणं हे परिस्थितीवर आणि फोटो काढणा-याच्या कौशल्यावर अवलंबून असतं.एक चांगला फोटो येण्यासाठी स्थळ, परिस्थीती, प्रकाश, रंग याचे उत्कृष्ट सुवर्णमध्य जमून यावे लागतात.म्हणून कधीकधी मोबाईलच्या कॅमे-यातूनही एखादा सनसेट अगदी झक्कास निघू शकतो. त्यामुळे महाग कॅमेरा घेतला म्हणून चांगले फोटो येतीलच अशी शास्वती नाही.

Activating Marathi/Hindi (UNICODE) on your Windows-XP

Image
Before you start anything, keep the printout of this paper handy. To activate Marathi/Hindi in Microsoft Windows-XP is really simple. You can activate it on pre-installed XP (SP2 Only Home/Professional) or during the Installation process.If you have already installing Win-XP SP2 , follow the steps - Open your control panel and double click  Regional and Language settings . Select India as your Location and then Apply . Keep your Windows-XP Installation CD inside CD-ROM Drive. In Languages Tab, Check both the checkmarks that says " Install support for... ." This will automatically install all the necessary files and fonts required for Devnagri Support. Please wait while it finishes copy process. Now, in the Same Tab, Click " Details " to add the Hindi keyboard and language files. In the dialogue box that appears, Select " Hindi " as language to add and it will automatically select 2 keyboard types " Devnagari INSCRIPT " and " Hindi

मला आवडलेली कविता

Image
प्रेमाला उपमा नाही प्रेमाला उपमा नाही ।। उपम्यात साखर नाही । साखरेला ऊस नाही । ऊसाला पाणी नाही । पाण्याला पंप नाही । पंपाला वीज नाही । वीजेला पैसा नाही । पैशाला काम नाही । कामाला नोकरी नाही । नोकरीला पदवी नाही । पदवीला कॉलेज नाही । कॉलेजला पोरी नाही । पोरीला प्रेम नाही । प्रेमाला उपमा नाही ।।